दिनांक 19 जानेवारी 2021 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, अर्थशास्त्र विभाग, वाणिज्य विभाग आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बचत ,ऑनलाईन डिजीटल बँकिंग आणि ऑनलाईन फ्रॉड बाबत मंगळवाार दि.१९ रोजी कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे या उपस्थित होत्या, तर व्यासपीठावर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे संचालक गोविंद कुलकर्णी शाखा उपव्यवस्थापक मोहित आडके ,अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.अरुण खर्डे, वाणिज्य विभागाचे प्रा संतोष काळे, प्रा.सचिन साबळे व भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. तानाजी फरतडे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना गोविंद कुलकर्णी म्हणाले की एखाद्या व्यक्तीने आपल्या मोबाईल वरती आलेला ओटीपी मागितल्यास कदापिही देऊ नये.बँक कधीही तुमचा ओ टी पी, गुपित नंबर आणि सी व्ही व्ही मागत नाही.यापैकी एखाद्या व्यक्तीने आपणास माहिती मागितल्यास तो फ्रॉड होऊ शकतो.आपले आर्थिक नुकसान होऊ शकते तेव्हा अशा फ्रॉड कॉल पासून व व्यक्ती पासून प्रत्येकाने सावध राहणे आवश्यक आहे. मोहित आडके आपल्या व्याख्यानामध्ये म्हणाले की बँकेमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत त्यापैकी बँकेत खाते कसे खोलायचे ,मोबाईल मध्ये ॲप कसे डाउनलोड करायचे ,आपल्या मोबाईल मध्ये घरी बसून कसे व्यवहार करायचे तसेच बँकेमध्ये पॉलिसी कशी काढायची व ती कोणाच्या मार्फत काढायची याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले .
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.दीपा सावळे म्हणाल्या की आर्थिक व्यवहारांमध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणाला फसवू नये किंवा स्वतः फसू नये . शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बँकेमध्ये खाते खोलत असताना एकही रुपया न भरता खाते खोलून देण्याची व्यवस्था बँकेने करावी असेही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.अरुण खर्डे यांनी केले तर प्रा.तानाजी फरतडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार ही मानले.
