परंडा / प्रतिनिधी :- 

भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद अंतर्गत परंडा तालुक्यातील मौजे शेळगाव येथे उमेद समूहातील महिलांना १० दिवशीय कुक्कटपालन व्यवसाय  प्रशिक्षणाचा मास्क, किट, वही पेन, उद्योजकता बुक देऊन पंचायत समिती परंडा सभापती अनुजा दैन यांच्या अध्यक्षतेखाली सुरवात करण्यात आली.  

यावेळी सभापती अनुजा दैन यांनी महिलांनी बायोगॅसचा ही उपयोग करावा. तसेच जिल्हा समन्वयक विकास गोफणे यांनी विविध योजनेची सविस्तर माहिती दिली.व होतकरू गरजू महिलांनी ग्रामीण भागातील शेती आधारे जोड व्यवसाय व शासनाच्या विविध योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तसेच आर्थिक समावेशन चे माणिकराव सोनटक्के यांनी फक्त चुल आणि मुल येवढेच ध्येय न ठेवता कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यात महिलांचा सिंहाचा वाटा असणं आवश्यक आहे. लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके यांनी कुक्कटपालन विषयी शेळगाव गावातील उद्योजिका जगताप यांच्या कुक्कटपालन चे उदाहरण देऊन प्रशिक्षण झाल्यानंतर बॅंक मार्फत लोन उपलब्ध होताच स्वतःला झोकून देऊन कुटुंबाला हातभार लावावा तसेच शेळीपालन, दुग्धव्यवसाय, गाडूळंखत, रेशीम उद्योग करून गटातील महिलांच्या सहकार्याने उतुगं भरारी घ्यावी. 

यावेळी उपस्थित पंचायत समिती परंडा सभापती अनुजा दैन, SBIRSETI चे असिस्टंट कलीम शेख, SBIRSITE चे समन्वयक विकास गोफणे, आर्थिक समावेशन चे माणिकराव सोनटक्के, उमेद चे लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, प्रेरिका जयश्री शेवाळे, जयश्री औताडे, राणी कोले व समुहातील महिलां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 
Top