जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महासचिव तथा कृषि अधिकारी पंचायत समिती उमरगा श्रीमती सारीकाताई अंबुरे यांच्या मुलावर दि.18 जानेवारी रोजी 2 वाजता झालेला भ्याड हल्ला, घरातील तोडफोड याचा निषेध व जलदगतीने तपास करुन हल्लेखोराचा शोध घ्यावा व अंबुरे कुटुंबियास तात्काळ पोलीस सुराक्षा पुरविण्यात यावी या मागणीसाठी परंडा तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने परंडा तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
हल्लेखोरावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास जिजाऊ ब्रिगेड उस्मानाबाद व जिजाऊ ब्रिगेड परंडा तालुक्याच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. निवेदन देताना जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ.आशा मोरजकर, प्रियंका क्षिरसागर, मनीषा जगताप, सुरेखा करळे, संजीवनी पाटील, पल्लवी पाटील, गीता थोरात, आंकाक्षा घोगरे, रेखा पाडुळे, सारीका मोरे, आश्वीनी जोगी, सुचिता साळुंके, ज्योती हजारे, कन्याकुमारी वाघमारे, डॉ.तेजस्विनी करळे, अपेक्षा पाटील, स्वराली घोगले, आंकाक्षा देशमुख, राजलक्ष्मी पाटील आदी जिजाऊ ब्रिगेडच्या महीला उपसस्थीत होत्या.
