तुळजापूर /प्रतिनिधी-
तालुक्यातील सिंदफळ येथील राजेद्र काशीनाथ क्षिरसागर यांच्या घरात शाँर्टसर्कीट होवुन लागलेल्या आगीत संसारपयोगी जिवनावश्यक वस्तु , साहित्य जळुन खाक झाले. या दुर्घटनेत एकुण ६७१५० रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवार दि.1 रोजी सकाळी घडली.
या बाबतीत अधिक माहिती अशी की, राजेंद्र क्षिरसागर यांच्या घरात शाँर्टसर्किट होवुन घरात आग लागुन टीव्ही, फँन, मोबाईल दोन ड्रेसिंग टेबल, गादी, गहु, ज्वारी, तांदुळाचे पोते आदी जळुन खाक होवुन एकुन ६७१५० रुपयाचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.
