उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम आणि येथील जिल्हा रुग्णालयातर्फे बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार “मोफत ताण-तणाव निवारण व सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे” आयोजन यशस्वी करण्यात आले होते.

 या शिबिराचे उद्घाटन धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. प्रास्तविकात मनोविकार तज्ज्ञ डॉ. राजेश नरवाडे यांनी सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वांमध्ये ताण तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये मानसिक आजार जडत आहेत. तेव्हा मानसिक आजार वेळीच ओळखून त्यावर उपचार करून घ्यावेत,असे आवाहन यावेळी केले.

 प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित राठोड यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णांना केले. या कार्यक्रमासाठी मनोविकार तज्ज्ञ डॉ. महेश कानडे व राजेश नरवाडे तसेच मॅनेजर डॉ. पंकज शिनगारे, डॉ. धीरज पाटील, श्री. ज्ञानोबा शेळके, समाधान नवले, सुहास शिंदे, बलराम पोतदार, विश्वजीत जगदाळे, अमृत कुंभार, पांडुरंग कोळेकर, परमेश्वर मुळे, सुधीर कावळे, शहाजी कदम, हर्षदा नारायणकर तसेच जिल्हा  रुग्णालयातील राष्ट्रीय कार्यक्रमाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

 यावेळी 82 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पोतदार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 
Top