तुळजापूर  / प्रतिनिधी- 

महाराष्ट्राचीकुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शाकंभरी नवराञोत्सवाचा सांगता  गुरूवार दि २८ रोजी श्रीगणेश ओवरीत शाकंभरी देविच्या  प्रतिमेसमोर बसविण्यात आलेल्या घटाचे दुपारी १२ वाजता  घटोत्यापन करण्यात येवुन झाला.

आज पौष पोर्णिमेचा पार्श्वभूमीवर देवीदर्नशनार्थ भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.यंदाचा शाकंभरी नवराञोत्सवावावर कोरोना चे सावट असल्याने हा प्रमुख उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला .  बुधवार दि13रोजी राञी निद्रस्त करण्यात आलेली  देविजींची मुर्ती गुरुवार दि.२१ रोजी  पहाटे देविजींचा सिंहासनावर विधीवत प्रतिष्ठापीत करण्यात आल्यानंतर शाकंभरी नवराञोत्सवास आरंभ झाला होता

 बुधवार २७ अग्नीस्थापना शतचंडी होमहवन धार्मिक विधी श्री गणेश ओवरीत पार पडला.गुरुवार दि२८ श्रीदेवीजींचे मंदीर पहाटे चरणतिर्थ होवुन खुले झाले पहाटेपासुनच  भाविकांनी देवीदर्नशनार्थ गर्दी केली होती.नंतर सकाळी देविजींना दुग्धअभिषेक करण्यात आल्यानंतर श्रीखंड सिहासन महापुजा करण्यात आल्यानंतर देविजींना वस्ञोलंकार घालण्यात आले.  दुपारी शाकंभरी नवराञोत्सवातील घट उठवण्यात येवुन  घटोत्थापन करण्यात आले. नंतर राञी मंदीर प्रांगणात देविंजींचा पारंपारिक छबिना काढण्यात आला.नंतर प्रक्षाळपुजा होवुन शाकंभरी नवराञोत्सवातील  व पौष पोर्णीमे तील धार्मिक विधीचा सांगता झाला .

 
Top