उस्मानाबाद / प्रतिनिधी :
हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जिल्हयात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. उस्मानाबाद शहरात शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
शनिवार दि. २३ जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यंाची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रदिप साळूंके, राजेंद्र घोडगे, पप्पू मुंडे, नगरसेवक सोमनाथ गुरव, हाणमंत देवकते, प्रवीण कोकाटे, नगरसेवक सिध्देश्वर कोळी यांच्यासह मोठया प्रमाणात िशवसैनिक उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्हयावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष असे प्रेम होते. १९८३ -८४ पासून उस्मानाबाद शहरात शिवसेनेचे वारे वाहत आहे.
