तालुक्यातील अनाळा येथे स्वयंम शिक्षण प्रयोग, उस्मानाबाद यांच्या वतीने महिला मेळावा व हळदी -कंकू कार्यक्रम दि.२२ रोजी संपन्न झाला.सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन महिलांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये स्वंयम शिक्षण प्रयोग उस्मानाबाद संस्थेच्या संचालिका नसिम शेख यांनी महिलांना शेळीपालन व शासनाच्या विविध योजनेची सविस्तर माहिती सांगितली. स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या कोमल कटकटे व राणी शेजाळ यांनी ही महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गावातील विविध पदावर कार्यरत असणाऱ्या महिला उपस्थित होत्या. या मध्ये आशास्वंयसेविका अनिता क्षिरसागर, इग्लीश स्कुलच्या मुख्याध्यापिका प्रियंका क्षिरसागर, उमेद स्वं.स. समुहाच्या प्रेरिका नौशाद शेख, रेणुका सुर्वे, कृषी सखी राणी रेवडे, उपजिविका सखी नसरीन शेख, समृद्धी ग्रामसंघाच्या अध्यक्षा रेखा सरवदे, लिपिका सविता बल्लाळ, नुतन ग्रा.प. सदस्या अंबिका क्षिरसागर, स्वाती चव्हाण यांच्यासह शबनाज शेख, आसिफा शेख, वनिता क्षिरसागर, अर्चना क्षिरसागर, साधना चव्हाण, गीताबाई गोडसे, उषा क्षिरसागर यांच्यासह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
