तेर / प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेरचा युनोस्कोमध्ये समावेश व्हावा यासाठी तेरचा ब्रहत विकास आराखडा तयार करण्यासाठी विविध वास्तु विशारदानी तेरला विविध ठिकाणी भेटी दिल्या.
कोल्हापूर ,नाशिक, पुणे, अंधेरी येथील वास्तु विशारद यांचा यावेळी संग्रहालयात तगर अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे, ह.भ.प.दिपक महाराज खरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेऴी तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, बाळकृष्ण लामतुरे ,अमोल गोटे याची उपस्थिती होती.
