तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील प्रभाग क्रमांक ८ चे काँग्रेसचे नगरसेवक रणजित भैय्या इंगळे यांनी माझा प्रभाग माझी जिम्मेदारी उपक्रम अंतर्गत  प्रभाग क्रमांक ८ मध्ये असलेल्या श्रीराम मंदीराचा संपूर्ण  परिसरात नगरसेवक श्री रणजीत भैय्या इंगळे यांनी स्वखर्चाने  फेवर ब्लॉक बसवून दिले.

तिर्थक्षेञ तुळजापूर येथे आर्य चौकात अतिप्राचीन राममंदीर असुन या मंदीरात जातानाचा रस्ता खराब झाला होता. या पार्श्वभूमीवर या प्रभागाचे नगरसेवक रणजित इंगळे यांनी सुमारे दोन लाख रुपये वैयक्तिक खर्चुन राममंदीर परिसर आर्य चौकातुन मंदीराकडे जाणाऱ्या संपुर्ण रस्त्यावरआकर्षक  पेवार ब्लाँक बसवुन दिल्याने रामभक्तांचा श्री प्रभुराम दर्शनार्थ जाणारा मार्ग सुकर झाला. या उपक्रम बद्दल श्रीराम भक्तांनसह शहरवासिय नगरसेवक रणजित इंगळे यांना धन्यवाद देत आहे

 
Top