तुळजापूर / प्रतिनिधी-

  तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरात शनिवार दि.१६ रोजी भव्य शोभायाञा काढुन  प्रभुश्रीराम मंदीर बांधकाम  निधी संकलन अभियानास प्रारंभ झाला. पालखीत ठेवलेल्या श्रीराम प्रतिमेस मंहत मावजी नाथ मंहत दत्तअरण्य बुवा  नगराध्यक्ष सचिन रोचकरी अँड अनिल काळे यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करुन भव्य शोभायाञास आरंभ झाला.

या शोभायात्रेत  रावसाहेब कुलकर्णी,  अँड महेंद्र देशमुख, अँड जनक पाटील, अर्जुन सांळुके, नागेश नाईक , इंद्रजित सांळुके, आनंद कंदले, क्रांती थिटे , प्रभावती मार्डीकर आदींसह लाखो रामभक्तांनी भाग घेतला.  हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण समिती, तुळजापूर यांनी परिश्रम घेतले. 

 
Top