काटी:- ( उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील निसर्ग काव्य मंच समुहाच्या वतीने उपक्रमशील शिक्षक तथा कवि, लेखक पंकज (कासार) काटकर यांच्या संकल्पनेतून आमची माती आमची माणसं हे कवि संमेलन येथील मुख्य बाजार चौकात बुधवार दि.27 रोजी सायंकाळी कवि, साहित्यिक,यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 

     या संमेलनाचे उदघाटन सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सुजित हंगरगेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, मकरंद देशमुख,जितेंद्र गुंड, पोलीस अभिजित गाटे, पत्रकार उमाजी गायकवाड,कवियित्री आशाबी शेख,जयश्री घोडके,सादिक शेख,अहमद पठाण,करीम बेग, सुनिल परिट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीमती भाग्यश्रीताई खुटाळे (कासार) फलटण यांच्याहस्ते करण्यात आले. तर संमेलनाध्यक्षा म्हणून मराठी साहित्य मंडळ बोरोवली विभाग मुंबईच्या श्रीमती विनिताताई कदम या होत्या. यावेळी आयोजक पंकज (कासार) काटकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून निसर्ग काव्य मंच व पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती विनिताताई कदम यांनी शेतकऱ्यावरील माझा शेतकरी राजा हि वास्तव मांडणारी कवितेचे सादरीकरण करून आपल्या मनोगतात निसर्ग काव्यमंचचे सर्व सदस्य व आयोजक पंकज (कासार) काटकर यांनी ग्रामीण भागात कविसाठी सलग दुसऱ्या वर्षी भरविण्यात आलेल्या कविसंमेलनामुळे नवोदित कविसाठी अविस्मरणीय मेजवानी असल्याचे मत व्यक्त करुन नवोदित कविनी भरपूर वाचन करावे व आपल्या कवितेतून वास्तवाचे दर्शन व भान ठेवून रचनात्मक मांडणी करून सादरीकरण करण्याचे आवाहन केले. तसेच कवि हा जगताचा धनी असल्याचे आवर्जून उल्लेख करीत त्यांच्या लेखनीचे महत्त्व व त्यांचा संघर्ष व त्यातून निर्माण साहित्य याविषयी सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच ग्रामीण भागातील कविंना पंकज (कासार) काटकर यांनी एकत्र बांधून त्यांच्या विचारांना प्रकट करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजन समितीचे आभार व्यक्त केले. व काव्याचा हा जागर असाच तेवत ठेवून कवितेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन करण्याचे आवाहन केले. 

     या कवि संमेलनात मुंबई, सोलापूर,बार्शी,फलटण, उस्मानाबाद,माढा आदी ठिकाणाहून एकूण 50 कवींनी सहभाग घेतला. यामध्ये कवि बालाजी पालमपल्ले, पोलीस अभिजित गाटे, युवराज जगताप, नितीन पाटील,आशाबी शेख, जयश्री घोडके,सादिक शेख,  बापू काळे, सुरज अंगुले, काटीतील फक्त दुसरीपर्यंत शिक्षण झालेला नवोदित कवि समीर कुरेशी, अजित थोरात, सागर गरड, युसूफ सय्यद, दत्ता आनंदगावकर, शेखर ठोंबरे, माधव धेंडे, फुलचंद नागटिळक, संतोष चव्हाण, सुशांत क्षिरसागर, वडरे सर, रविराज राठोड, प्रकाश हिरेमठ, गणेश लोंढे, शिवाजी गाडेकर,बालकवी क्षिरसागर‌ सावंतवाडी आदी मान्यवर कविंनी देशभक्ती,प्रेम, शेतकरी व्यथा,गरिबी,आई-बाप, बेटी बचाव, निसर्ग, मृत्यू,जगणं अशा विविध विषयांवरील कविता वाचन तर काही कवींनी गायनातून सादरीकरण करून उपस्थितांना अंतर्मुख केले.तर सर्व कविंना रसिकांनी भरभरून दाद दिली.या कवि संमेलनात दुसरी पर्यंत शिक्षण झालेला नवोदित कवि समीर कुरेशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील माझा राजा असा होता, त्यांच्या छायेत प्रत्येक समाज होता!मसुदीला जागा नाही ऐकताच स्वत:च्या महेल शेजारी मशीद बांधली, मनी कधी भेदभाव नव्हता!! हि कविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली तर पोलीस अभिजित गाटे यांनी पोरी जरा जपून वाग...पोरी तु माझी लेक, मी तुझा बाप हाय, पोरी जरा जपून वाग...व युवराज जगताप यांनी नशा नाद खुळा हे अभंग गावून प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

       यावेळी आयोजन समितीच्या वतीने कवि पंकज (कासार)काटकर यांनी हे संमेलन यापुढे प्रत्येक वर्षी अखंडपणे चालू ठेवणार असल्याचा निश्चय यावेळी व्यक्त केला. या कवि संमेलनाचे सुत्रसंचलन सहशिक्षक पंकज काटकर तर आभार अनिल हंगरकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज काटकर, अनिल हंगरकर, दयानंद जवळगावकर, बापू काळे, हर्शवर्धन माळी, सोमनाथ जामगावकर, पंकज भापकर आदींनी परिश्रम घेतले.

 
Top