उस्मानाबाद/ प्रतिनिधी

खरीप हंगाम सन 2020 ते 2021 मध्ये ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अतीवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पीक विमा मिळणे बाबत बहुजन योध्दा सामाजिक संघटनेच्या वतीने पालकमंत्री शंकरराव गडाख व जिल्हाधिकारी कौस्तुब दिवेगावकर यांना निवेदनात देण्यात आले. 

 उस्मानाबाद जिल्हयातील माहे ऑगस्ट ऑक्टोबर  सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्व पिकांचे मुख्यतः सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे.सदर नुकसानिचे शासना मार्फत पंचनामे झाले असुन शेतकर्यांना शासनाकडुन नुकसान भरपाई मिळाली आहे.या हंगामात उस्मानाबाद जिल्हयातील सर्व शेतकर्यांनी पीक विमा भरला आहे.विमा कंपणीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार हंगामातील पीकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबंधित शेतकर्यांने विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रारी करणे बंदनकारक आहे.परंतु तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन मोबाईल फोन नाहित काही शेतकर्यांना ऑनलाईन माहिती भरण्याची तांत्रिक माहिती नसल्याने विमा कंपणीकडे ऑनलाईन तक्रारी नोंद करता आल्या नाहीत.संबधित विमा कंपनी मार्फत खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कंपनीकडे नोंद झालेल्या ऑनलाईन तक्रारी पैकी काही तक्रारीचे पंचनामे झाले आहेत,परंतु कंपनीकडे आवश्यक मनुष्यबळ नसल्यामुळे सर्व नोंद केलेल्या तक्रारीचे पंचनामे झालेले नाहीत तरीही संबंधित विमा कंपनी मार्फत शासकीय यंत्रणेेने केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा आधार घेऊन काही शेतकऱ्यांना विमा मंजुर केला आहे.परंतु ऑनलाईन तक्रारी नोंद होऊनही शेतकर्यांना विमा मिळाला नाही आम्ही सर्व मानणीय साहेबांना नम्र विनंती करतो की खरीप हंगामात अतिवृष्टी मुळे तालुक्यतील सर्व शेतकर्यांचे व सर्व पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे तरी विनंती वरील सर्व बाबींचा सहानुभुतीपुर्वक विचार होऊन उस्मानाबाद तालुक्यातील विमा भरलेल्या सर्व शेतकर्यांना सरसकट विमा मंजुर करणे बाबत संबंधित विमा कंपणीकडे पाठपुरावा करावा मागणी करण्यात आली आहे. निवेदन देते समयी धनंजय शिंगाडे,  नितिन शेरखाने , आळणीकर,लक्ष्मण माने आदिसह शेतकरी उपस्थित होते. 

 
Top