उस्मानाबाद / प्रतिनिधी -

 तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका  30 वर्षीय मूकबधिर विकलांग व्यक्तीला पायाला साखळदंड बांधून त्याच्याकडून कामे करून घेत असल्याचे समोर आले आहे.

तुळजापूर -  नळदुर्ग रोडवर गंधोरा बूस्टर येथील तांबोळी धाब्यावर हा धक्कादायक आणि अमानवी प्रकार घडला आहे. मधुकर नामक विकलांग, मूकबधिर व्यक्तीकडून स्वयंपाकाची कामे करून घेतली जात होती. तो काम सोडून कुठेही जावू  नये म्हणून त्याच्या पायाला नेहमीच साखळदंड बांधून गुलामाची वागणूक दिली जात होती.


 
Top