उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 थोर स्वातंत्र्य सेनानी भाई उद्धवराव पाटील यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी हायस्कूल, उस्मानाबाद येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री.धनंजय पाटील, सौ. सुलभाताई पाटील देशमुख, श्री. संजय देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, बुद्दिजीवी सेल चे प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, उपनगराध्यक्ष श्री.अभय इंगळे, श्री.युवराज नळे, भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.राजसिंह राजेनिंबाळकर, श्री.प्रवीण पाठक, श्री.अमर बकले, श्री.दादा पठाण उपस्थित होते.

 उस्मानाबादचे वैभव असलेले व राज्यभर श्रमिकांचे नेते म्हणून ओळख असणारे भाई उद्धवराव पाटील यांच्या कार्याचे स्मरण कायम रहावे व यातून त्यांच्या कार्याची प्रेरणा सतत मिळावी यासाठी उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वातंत्र्य सेनानी भाई उद्धवराव पाटील यांचे नाव देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली व या अनुषंगाने मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब व वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. अमित देशमुख साहेब यांच्याकडे रीतसर मागणी करून पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान आ. राणाजगजीतसिंहजी पाटील साहेब यांनी दिली. अनेक वर्षाच्या नियोजनबद्ध परिश्रमानंतर मंजूर झालेल्या महाविद्यालयाला दादांचे नाव देणे सार्थ राहील, ही भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद उस्मानाबाद तसेच नगर परिषद उस्मानाबाद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे या अनुषंगाने ठराव घेण्याचे देखील या चर्चे दरम्यान ठरले आहे.

 उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी पुढील आठवड्यात बारामती येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अभ्यास दौरा करण्याचे देखील ठरले आहे. राजकारण विरहित विकासासाठी सर्वांनी एकत्रित रित्या काम करणे हीच खऱ्या अर्थाने स्व.भाई उद्धवराव (दादा) पाटील यांना आदरांजली असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

 
Top