उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एका गावातील शेतात डीपी बसवण्यासाठी 55 हजारांची लाच घेताना 2 जणांना उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने अटक केली आहे. महावितरण विभागाचे एका इंजिनिअरसह 2 जण अटकेत असून याबाबत अधिक तपास सुरू आहे , या अधिकाऱ्यांना उस्मानाबाद शहरातील एमआयडीसी परिसरात लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तुळजापूर तालुक्यातील शहापूर गावातील शेतात डीपी बसवण्यासाठी 1 लाखांची मागणी करण्यात आली होती त्यातील 55 हजार घेताना अटक केली आहे. उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही मोठी कारवाई आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद, बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी.बीड यांचे मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षण, ला. प्र. वी. अशोक हुलगे , पोलीस निरीक्षक, ला. प्र. वी. उस्मानाबाद यांनी केली.याकामी त्यांना पोलीस अंमलदार इपतेकर शेख, दिनकर उगलमूगले, पांडुरंग डमरे, मधुकर जाधव ,विष्णू बेळे, विशाल डोके, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य व चालक करडे यांनी मदत केली.
