उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिम दि.31 जानेवारी 2021 रोजी जिल्हयात राबविण्यात येणार आहे.या मोहिमे अंतर्गत शून्य ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलीओ लस देण्यात येणार आहे.या मोहिमेअंतर्गत उसतोड कामगारांच्या झोपडया,फिरत्या कामगारांच्या वस्त्या,बांधकामे या ठिकाणे असलेली बालके लसीकरणापासून वंचित राहू नये.यासाठी यांच्याकडे विशेष लक्ष देवून जास्तीत जास्त बालकांना लस देण्याबाबत नियोजन करुन लस द्यावी व या मोहिमेमध्ये कोविड-19 मधील मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

 या मोहिमेत जिल्हयात 1301 बुथची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 1190 व शहरी भागासाठी 111 बुथचे नियोजन करण्यात आलेले आहे.या मोहिमेसाठी आरोग्य कर्मचारी, आरोग्य पर्यवेक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेविका, पर्यवेक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हास्तरीय अधिकारी यांचा सहभाग असणार आहे. शून्य ते 5 या वयोगटातील अपेक्षित लाभार्थी ग्रामीण  भागातील 156325 व शहरी  भागातील 17447 अशी एकूण एक लाख73 हजार 772 लाभार्थी बालक असतील. या व्यतिरिक्त मोबाईल व टांझिट टिमची सोय करण्यात आलेली असुन यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे.या मोहिमेत शिक्षण विभाग,महिला व बालविकास विभाग,विद्युत महामंडळ,एस टी महामंडळ,सामाजिक मंडळे आदी मदत घेतली जाणार आहे,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे  यांनी दिली.

 या मोहिमेमध्ये पालकांनी आपल्या 5 वर्षापर्यंतच्या बालकांना दि.31 जानेवारी 2021 रोजी नजीकच्या बुथवर जावून पोलिओ लसीचा द्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे डॉ.विजयकुमार फड,जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदेचे डॉ.एच.व्ही.वडगावे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.डी.के.पाटील जिल्हा रुग्णालय,उस्मानाबाद यांनी केले.

 
Top