तुळजापूर / प्रतिनिधी
श्री तुळजाभवानी मंदीरातील सिंह गाभाऱ्यात मंदीराचा उत्तर बाजू कडील भवानीशंकर गेटध्दार पुजारी वृंध्दांना सिंह गाभाऱ्यात मंगळवार दि ५पासुन सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
तसेच मंदीरात बेशिस्त वर्तन करणारे व नियमांचे पालन न करणाऱ्या ८ जणांना ३ महिनेमंदीर प्रवेश बंदी केली असुन तसेच पाळी नसताना मंदीरात गाभाऱ्यात प्रवेश करुन देवल कवायत कलम ३६ उल्लंघन केल्या प्रकरणी १६ जणांना आपणास ६ महिने करीता मंदीरात प्रवेश बंदी का करु नये अशी कारणे दाखवा नोटीस १६ जणांना बजावली आहे
कोरोना पार्श्वभूमीवर पुजारीवृंदांना गाभाऱ्यात सोडले जात नव्हते अखेर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या नियमांचे पालन करणे बाबतीत पुजारी मंडळाने सहमती पञ दिल्यानंतर मंदीर सिंह गाभाऱ्यात पुजारी वृंदांना सोडण्याची निर्णय अमलबजावणी मंगळवार दि.५ पासुन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रकरणी पुजारी वृंदानी प्रशाषणास सहकार्य करावै असे आवाहन मंदीर प्रशासनाने केले आहे.