उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हयातील आळणी येथे असलेल्या स्वाधार मंतीमंद मुलींच्या बालगृहामध्ये मुलांचा संस्थेतील कर्मचारी-अधिकारी आणि संस्थाचालक मातृऱ्हदयाने सांभाळ करत असल्यानेच येथील मुलींचे जीवन जगणे सुसह्य होत आहे,असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  डॉ.विजयकुमार फड यांनी आज आळणी येथे केले.

पानगाव येथील तुळजाई प्रतिष्ठाण तर्फे चालवल्या जाणाऱ्या या संस्थेस आज डॉ. फड यांनी सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या कामाची पाहणी केली. या संस्थेस राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे अनुदान दिले जाते.जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फेत याबाबत कार्यवाही होते.कोर्टाने सुपूर्त केलेल्याच मुलींना येथे प्रवेश दिला जातो.समाजात अतिशय दुर्लक्षित असलेल्या या घटकाकडे समाजाने लक्ष देण्याची गरज आहे,असे सांगून डॉ.फड यांनी येथे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतूक करून आपण स्वत:च्या पोटच्या लेकराप्रमाणे या मुलींची काळजी घेत असल्याचे सागितले.

या भेटी दरम्यान संस्थेतील मुलींनी सुरेल आवाजात स्वागत गीत सादर केले.जि.प.चे समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांनी या संस्थेच्या कामांचे कौतूक असून या मुलींना जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत राहू असे सांगितले. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव शहाजी चव्हाण यांनी संस्थेची माहिती दिली.संस्थेची स्थापन 2008 मध्यझाली असून सुरूवात तीन-चार मुलींनी होवून आता संस्था 107 वर पोहचली आहे.एक ते अठरा वर्षे वयो गटातील मुलींचा सांभाळ करण्यासाठी शासनाची मदत मिळते त्यानंतर त्या मुलींना समाजातील नागरिकांनी दत्तक घेणे अपेक्षित आहेत.युरोपातही प्रथा आहे,पण आपल्या कडे कुणीही पुढे येत नाही म्हणून संस्थाच अशा 30-35 मुलींना दत्तक घेवून त्यांचा सांभाळ करीत आहे,असेही त्यांनी सांगितले. या भेटीच्या वेळी जिल्हा कृषि अधिकारी तानाजी चिमनशेटटी आणि बालाजी कांबळे उपस्थित होते. 

 
Top