उस्मानाबाद / प्रतिनिधी-
केंद्र शासन सहाय्यीत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) ही केंद्र पुरस्कृत योजना 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन आहे. ही योजना असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रीया उद्योगांसाठी राबविली जाणार आहे. या योजनेअंतर्गत इनक्युबेशन सेंटरची जिल्हयातील उद्योजक, स्वयंसहाय्यता गट,शेतकरी उत्पादक संघ/शेतकरी उत्पादक कंपनी,सहकारी उत्पादक संस्था,सहकारी संघ आदी साठी अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देणे, प्रशिक्षण देणे याबाबींसाठी उभारणी करावयाची आहे.
यामध्ये इनक्यबेशन सेंटर एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) वर ( पिक -1. हरभरा 2.कांदा 3.सोयाबीन ) आधारीत 2-4 उत्पादनांच्या आधारीत प्रक्रिया व इनक्युबेशन सुविधा उपलब्ध करणे तसेच कमीत कमी तीन व जास्तीत जास्त पाच प्रक्रिया लाईनसाठी PMFME अंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला जाईल. इनक्युबेशन सेंटर हे स्टार्टअप्स आणि लहान अन्नप्रक्रीया युनिटसाठी नाममात्र भाडेतत्त्वावर उपल्बध करुन दिले जाईल.
ईनक्युबेशन केंद्राकडे अन्न प्रक्रिया उद्योगांच्या मानक निकषानुसार पूर्ण प्रक्रिया सुविधा आणि कमीत कमी 7000 चौ.फुट जागा असणे आवश्यक आहे.त्या अनुषंगाने इनक्युबेशन सेंटर उभारणीकरीता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या योजने अंतर्गत शासकीय संस्था यांना 100 टक्के तर खाजगी संस्थांना 50 टक्के निधी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेअंतर्गत (PMMFME) अंतर्गत देण्यात येईल. अधिक माहितीसाठी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय फोन-02472-227118 सपंर्क करावा,असे आवाहन जिल्हा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे