उस्मानाबाद / प्रतिनिधी

 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांची कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजीव सेवकपदी निवड झाली आहे.

प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी याअगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात संचालकपदी काम पाहिले. विद्यापीठ  व्यवस्थापन परिषदेचे विद्यमान सदस्य व जिल्हा प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. याअगोदरच त्यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळात सदस्यपदी निवड झाली होती.सध्या ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या उस्मानाबाद विभागीय केंद्राचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्य करत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, सहसचिव डॉ. युवराज भोसले, डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top