उस्मानाबाद / प्रतिनिधी:
 गेल्या दीढ वर्षाच्या कार्याकाळात विद्यापीठातील सर्व अधिकार मंडळाच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिपाद दिला. या काळातील वाटचाल आश्वासक असून नवीन दिशा देणारी आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक सोमवारी दि.२८ नाटयगृहात झाली. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. अधिसभा बैठकीस ५५ सदस्य उपस्थित होते. प्रारंभी नवनियुक्त सदस्य डॉ.शाम शिरसाठ, डॉ.जयश्री सूर्यवंशी, डॉ.योगेश पाटील, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.वाल्मिक सरवदे आदींचा सत्कार करण्यात आला. गेल्या वेळची अधिसभा बैठक १३ मार्च २०२० रोजी झाली. त्यानंतर साडे नऊ महिन्यात झालेली घडामोड, विद्यापीठाने राबविलेले उपक्रम व कोविडच्या काळात विद्यापीठात केले सामाजिक कार्य याबद्दलची माहिती मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली. ते म्हणाले, कुलगुरु पदाची सुत्रे १६ जुलै २०१९ रोजी घेतल्यापासून विद्यार्थी वेंâद्रीत, पारदर्शक व गतीमान प्रशासन अशी त्रिसुत्री समोर ठेऊन कामकाज सुरु केले. विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकार-कर्मचारी व विद्यार्थी या तिनही घटकांन परिवर्तनाच्या प्रक्रियेत सकारात्मक साथ दिली. व्यवस्थापन परिषदेसह सर्व अधिकार मंडळाचे ही मोलाचे पाठबळ लाभले. प्रगतीच्या दिशेने काम सुरु असताना ‘कोविड‘चे अनिष्ठ सा-या जगावर ओढवले. प्रगतीचा काही प्रमाणात ब्रेक लागला तथापि आपल्या विद्यापीठाने सामाजिक कृतज्ञनेची जाणीव ठेऊन कोविडच्या दोन लॅब, मुख्यमंत्री निधी, गरजू विद्याथ्र्यांना जीवनावश्यक साहित्य पुरवढा, मास्क वाटप आदी उपक्रम राबविले. विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा सोजना अत्यंत सकारात्मकरितीने या संकटाला सामोरे गेले. या दोन्ही लॅब ‘सीएसआर‘ पंâडातून उभारण्यात आल्या. उस्मानाबाद लॅबसाठी व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी पुढाकार घेतला. तसेच डॉ.पुâलचंद सलामपुरे, डॉ.राजेश करपे यांच्यासह अध्यक्षतेखाली समिती उत्तमरितीने काम करलत आहे. ‘कोविड‘नंतरचे न्यू नॉर्मल जीवन सुखाचे जावो यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ऑनलाईन परीक्षा, निकाल आदीसह विविध विषयांचा ऊहापोह केला. दरम्यान, विद्यापीठ निधीतून वंâत्राटारामार्पâत दैनंदिन तत्वावर वंâत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी पाच अधिसभा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत अ‍ॅड.विजय सुबुकडे, ज्येष्ठ सदस्य भाऊसाहेब राजळे, डॉ.रमेश भुतेकर, डॉ.जितेंद्र देहाडे प प्रा.सुनील मगरे या सदस्यांचा समावेश आहे. सदर समितीत वंâत्राटी कर्मचारी या संदर्भात अभ्यास करुन विद्यापीठाला अहवाल सादर करणार आहे.  

 
Top