रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे असे मत डॉ दामोदर पतंगे यांनी व्यक्त केले.टिपू सुलतान जयंती निमित्त उमर्गन्स ग्रुप च्या वतीने सोमवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले होते.त्यावेळी श्री पतंगे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक श्री आघाव होते तर प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, मुस्लिम जमात चे अध्यक्ष बाबा औटी, सादिक कारचे, खालेद शेख यांनी प्रमुख उपस्थिती होती. शहरातील उमर्गन्स या व्हाट्सएप ग्रुप च्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, या शिबिरात एकूण 31 दात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमासाठी कलीम पठाण, खाजा मुजावर, जाहेद मुल्ला, रहीम लंगडे, हाफिज राशीद, मौलाना आयुब, अजहर शेख, फैजल पटेल, हाफिज अमजद, आदींनी पुढाकार घेतला. प्रास्ताविक खाजा मुजावर तर आभार कलिंम पठाण यांनी मानले
