परंडा/ प्रतिनिधी : तालुक्यातील कात्राबाद हे गाव नेहमीच पाणी टंचाईने त्रस्त होते.नेहमीच गावांमध्ये प्रत्येक वर्षी पाणीपुरवठा हा टँकरने करावा लागायचा.गावाच्या आसपास कुठेही कायम पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने गावांमध्ये नेहमी पाणीटंचाई भासत असत.हीच बाब राजाभाऊ शेळके यांच्या लक्षात आली.त्यामुळे त्यांनी गावापासून एक किलोमीटर दूर असलेल्या शेतात त्यांनी स्वतः विंधन विहीर कूपनलिका घेऊन गावासाठी एक किलोमीटरवरून पाणी गावात आणून स्वतःच्या खर्चाने ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून दिले.त्याच्या पुढे जाऊन शेळके यांनी गावांमध्ये ठिकठीकाणी पाण्याच्या टाक्या बसवून  पाणी वाटप केले.कात्राबाद मध्ये संपुर्ण गावात  पाण्याच्या टाक्या द्वारे सध्या पाणी वाटप होतआहे. या पाणी टाक्याचे उद्‌घाटन जि.प.सदस्य नवनाथ जगताप यांच्या हस्ते  करण्यात आले.त्याच बरोबर शेळके यांनी दिवाळी निमित्त ग्रामस्थांना साखर वाटप करून दिवाळी गोड केली होती.शेळके यांच्या या जनहित कार्यामुळे कात्राबद येथील ग्रामस्था कडून कौतुक होत आहे.

  यावेळी जि.सदस्यनवनाथ(आप्पा)जगताप,गोविंद जाधव सर ,नगरसेवक राहुल बनसोडे,अॅड. हनुमंत वाघमोडे, विलास गरड,विष्णू गरड, गोकुळ गारद बोराडे, अमोल गरड, परसराम कोळी, विजय मोरे, सतीश शेळके, लक्ष्मण गरड, गणेश कोकाटे, प्रवीण गरड शेळके, इर्शाद पटेल, लक्ष्मण शेळके, पांडुरंग गरड,. दिगंबर कोळी, संतोष बोराडे आदीसह ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top