उमरगा / प्रतिनिधी-
गुंजोटी येथील बापुराव पाटील मित्र मंडळ, शरणजी पाटील युवा मंच यांच्या वतीने गुंजोटी येथे वास्तव्य करणाऱ्या गरीब,निराधार कुटुंबातील महिला ,पुरुष यांना ब्लँकेट देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.
सध्य परिस्थितीत थंडीचे वातावरण असल्याने व त्यां कुटुंबातील सदस्यांना थंडीपासुन बचाव होण्यासाठी ब्लँकेट देऊन सामाजिक बांधीलकी जोपासली,हा उपक्रम सिद्राम देशमुख व बालाजी पोतदार यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला. यावेळी डॉ मोमीन मुजीब,माजी उपसरपंच शिवाजीराव गायकवाड,सोसायटीचे संचालक किसन पाटील,दिलीप सूर्यवंशी, चंद्रशेखर कदेरे,शिवराया पाटील, सिद्दु रेड्डी, बाळू शिवणेचारी,रवींद्र देशमुख, राम रेड्डी सह आदी उपस्थित होते.
