कोरोना पार्श्वभूमीवर गेली आठ महिन्यापासुन भाविकांनसाठी बंद असलेले श्री तुळजाभवानी मंदीर दिपावली पाडव्याचा शुभमुहुर्तावर भाविकांना दर्शनासाठी खुले करताच देविदर्शनासाठी आस लागलेला भाविक वर्ग गेली तीन दिवसापासून तिर्थक्षेञी गर्दी करीत असल्याने आठ महिन्यानंतर तिर्थक्षेञ तुळजापूर भाविकांनी गजबजुन जात आहे. तीन दिवसात सुमारे २० हजार भाविकांना दर्शन घेतल्याचे समजते. ज्यांना देविचे दर्शन घडत आहे ते भाविक धन्य -धन्य होत आहेत हा भाविकांचा ओघ काही दिवस असाच राहण्याची शक्यता आहे. मंदीर खुले झाल्याने माञ तिर्थक्षेञ तुळजापूरात व भाविक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दररोज केवळ ४ हजार भाविकांना दर्शनाची मर्यादा असतानाही मंदिर संस्थानच्या योग्य नियोजनामुळे दररोज वाढत्या संख्येने भाविक दर्शन घेत आहेत. गेल्या ३ दिवसांत दररोज सरासरी ६ हजार भाविकांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. तुळजाभवानी मंदिरात सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग, सोशल डिस्टन्सिग आदी उपायोजनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत असून, ऑनलाईन दर्शन पास सुविधेच्या माध्यमातून आगामी काळात भाविकांना दर्शन मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान भाविकांनी बाजारपेठ गजबजल्याने व्यावसायिकांत उत्साहाचे वातावरण आहे.
जागतिक महामारी कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या ८ महिन्यांपासून बंद असलेले तुळजाभवानी मंदिर दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे. भाविकांची वाढती गर्दी पाहता मंदिर संस्थानच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. ८ महिन्यांनंतर मंदिर उघडण्यात आल्याने मंदिर संस्थानने पहिल्यांदाच भाविकांच्या माहितीसाठी शहरात ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावले आहेत. यामध्ये मंदिराकडे जाणारा मार्ग, दर्शन पास, पार्किंग,नो पार्किंग आदींचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारी ५५००, मंगळवारी ६ हजार व बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ६५०० भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. येणाऱ्या काळात भािवकांची संख्या वाढू शकते. नियमांचे पालन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आलेल्या भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडले जाऊ लागले.
