वाशी / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी विद्यालयाला किचनशेड बांधकाम मंजूर पहिला धनादेश 1,11,000 रु प्राप्त झाला. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत ग्रामीण भागातील खाजगी अनुदानित शाळांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचेकडून समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत किचनशेड बांधकाम मंजूर करण्यात आलेले होते. मंजूर रक्कम 2,22,000 पैकी गट शिक्षण कार्यालय वाशीचे गटशिक्षणाधिकारी यांचेकडून 1,11,000 रुपयेचा पहिला धनादेश गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी यांनी विद्यालयाचे पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत यांचेकडे सुपूर्द केला .
धनादेश सुपूर्द करतेवेळी शिक्षण विस्तार अधिकारी आर.एस. जाधव , के. पी. जगदाळे , केंद्रप्रमुख एस. आर. कुलकर्णी, एम. पी. कांबळे , ए. व्ही. कांबळे, शालेय पोषण आहार प्रमुख डी. के. घुमरे एस. व्ही. क्षीरसागर , एस. बी. मिसाळ उपस्थित होते.
