उस्मानाबाद/ प्रतिनिधी
सुशिल सुधाकर झोरी याचे जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी दि. १४ सप्टेंबर २०१८ रोजी प्रस्ताव दाखल केलेला आहे. त्या प्रस्तावाबरोबरच कु. दिपांजली सुधाकर झोरी हिचे जात वैधता प्रमाणपत्र क्रमांक A१८०४३१८ दि. ०९.०८.२०१८ हे मुलाच्या प्रस्तावासोबत जोडले आहे. असे असताना ही मुलाचे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव हा प्रलंबीत आहे. तरी जात पडताळणी प्रस्ताव निकाली न काढल्यास मी आत्मदहन करने, असा इशाराच सुधाकर झोनी यांनी संबंधित कार्यालयास दिला आहे.
या संदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या मुलाचे बी.एस्सी अॅग्री हे शिक्षण पुर्ण झाले असून त्याचे शैक्षणीक कागदपत्रे जात वैधताप्रमाणपत्रा अभावी रोखून ठेवली आहेत. त्यामुळे त्याचे एम.एस्सी ॲग्रीसाठीचा प्रवेश या वर्षीच्या शैक्षणीक वर्षात होवू शकला नाही व त्याचे शैक्षणीक वर्ष वाया गेल्यामुळे त्याला नैराश्य आले आहे. त्यामुळे त्याच्या जिविताचे बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील. जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रस्ताव सादर केल्यापासून मी व माझा मुलगा सातत्याने आपल्या कार्यालयात चक्रा मारीत आहोत. पण जात पडताळणी प्रस्ताव निकाली काढला जात नाही. यामुळे मुलाच्या झालेल्या शैक्षणीक नुकसानीस आपले कार्यालय जबाबदार आहे.’ याबाबत या महिना अखेरपर्यंत निर्णय न झाल्यास मी आपल्या कार्यालयात आत्मदहन किंवा विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा इशाराच दिला आहे.