उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कळंब शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी नारी शक्ती महिला मंडळ यांच्याद्वारे डीवाय एसपी,मा एस.बी काशिद यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच महिलांच्या विविध समस्या काशीद समोर मांडण्यात आल्या. यावेळी नारी शक्ती महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सौ. ज्योती प्रकाश सपाटे, सौ. शैला अशोक चोंदे, सौ. शितल संजय गायकवाड, सौ. सुलभा विकास गायकवाड, सौ. शारदा मच्छिंद्र बचुटे,सौ प्रेमा बन्सी धिमधिमे, सौ. इंदुबाई बिभीषण तनपुरे, आदी महिला सदस्य उपस्थित होत्या. श्री. काशीद यांनी सकारात्मक असा प्रतिसाद त्यांना दिला कळंब शहरात कसल्याही प्रकारची महिलांना समस्या असल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी सर्व नारी शक्ती महीला मंडळाला केले.
