जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उस्मानाबाद यांचे निर्देशानुसार उस्मानाबाद शहरातील खाजगी आस्थापनेतील कर्मचारी व शहरातील नागरीक सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोवीउ 19 चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन खबरदारीचा उपाय म्हणून चेह-यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. जे नागरीक विना मास्क सार्वजनिक ठिकाणी वावरताना आढळून आल्यास संबंधिता विरुद्ध नमुद दंडा नसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. यांची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नगर परिषदचे मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांनी केले आहे.
यामध्ये मास्क न वापरणे रुपये 500/-दंड, सार्वजनिक ठिकाणी धुंकणे रुपये 200/-दंड, आस्थापना वेळेवर बंद न करणे रुपये 1000/-दंड आकरण्यात येणार आहे. यासाठी शहरातील विविध भागात निरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पथकाचे प्रमुख म्हणुन श्री रोहन देशमुख आहेत. तर श्री उमेश राऊळ लिपीक सहायक यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ते पोलीस स्टेशन, श्री राजेंद्र देकवते लिपीक सहायक यांच्याकडे छत्रपती शिवाजी शाळा ते नेहरु चौक, बाजार चौक हा भाग देण्यात आला आहे. श्री राजाराम पवार शिपाई मदतनीस यांना दर्गा रोड, खाजा नगर आडत लाईन देशपांडे स्टैंड हा इलाखा सोपविण्यात आला आहे. श्री तनाजी सुरवसे शिपाई मदतनीस यांच्याकडे भिम नगर, सईस गल्ली , खाटीक गल्ली या भागाची जिम्मेदारी सोपविण्यात आली आहे. श्री अलीम शब्बीर शेख मदतनीस यांच्याकडे सांजारोड, उंबरे कोठा, बाशी नाका, समता, कॉलनी, राम नगर , समर्थनगर डी आय सी रोड गालीब नगर, महात्मा गांधी नगर आनंद नगर एम आय डी सी दोन्ही भाग शाहु नगर आदी भागाची जिम्मेदारी सोपिवण्यात आली आहे.
पथक प्रमुख यांनी दंडात्मक कार्यवाही करुन दंड वसुल करावा व त्याचा अहवाल श्री एन.के. केंद्रे नगर अभियंता यांच्याकडे दयावा.सदर कामात टाळाटाळ हयगय, निष्काळजीपणा परस्पर गैरहजर राहील्याचे निर्दशनास आल्यास साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापना कायदा 2005 नुसार कार्यवाही करण्यात येईल , असा इशारा नगर परिषदचे मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांनी दिली आहे.
