तालुक्यातील अंबेजवळगा विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या अंबेहोळ येथील वनराई बंधार्याची पाहणी करण्यासाठी दि.10 / 11 / 2020 सकाळी 11:00 वाजता उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.श्री.अनिलकुमार नवाळे साहेब यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली.
यावेळी त्यांच्या सोबत बाल विकास अधिकारी श्री.अनिल कांबळे साहेब, उस्मानाबादच्या गट विकास अधिकारी श्रीमती.दिवाने मॅडम, उस्मानाबाद तालुका अंबेजवळगा विभाग पर्यवेक्षिका श्रीमती.एस.बी. देशमुख मॅडम, ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी मा.श्री.अनिलकुमार नवाळे साहेब यांनी अंबेहोळ येथील बांधण्यात आलेल्या वनराई बंधा-याची पाहणी करताना झालेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक करून अंबेजवळगा विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती.एस.बी.देशमुख व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य व ग्रामस्थांनी केलेल्या कोरोना काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीत देखील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष केलेल्यांचे मन : पूर्वक आभार मानले.
