तुळजापूर/ प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील अग्रगण्य असणारी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व सभासदांची दिवाळी गोड व्हावी कोरोना रोगाच्या महामारी मुळे सध्या सर्वांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत ही बाब लक्षात घेऊन संस्थेने या वर्षी सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर केल्याचे संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री नारायण नन्नवरे यांनी यावेळी सांगितले आहे तसेच संस्थेस सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात शेहचाळीस लाख पासष्ट हजार चारशे चोवीस रू इतका नफा झालेला आहे या नफ्यातून जाहीर केलेल्या लभांश रक्कमेचे वाटप संस्थेच्या कार्यालयात रोखीने करण्यात येत आहे. जवळपास अकरा लाख रुपये एवढी रक्कम सभासदांना लाभांश रुपी देण्यात येत आहे या लाभांश बरोबरच संस्थेने संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक  महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात आला आहे* असे ही यावेळी सांगण्यात आले संस्थेच्या सभासदांनी लाभांश घेण्यासाठी येताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्यती खबरदारी घेऊन संस्थेकडे यावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

लाभांश वाटपाच्या प्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन श्रीकांत भोजने संजय व्हटकर राजेंद्र माळी, सौ अनुराधा गायकवाड, सौ सुरेखा देशमाने संतोष इंगळे यांच्यासह संस्थेचे सभासद, कर्मचारी ठेवीदार खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते

 
Top