शेतकरी, शेतमजूर, विधवा, परितक्त्या, अनाथ, अपंग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सामाजिक जानीवेतून कायदेशीर सल्ला व न्यायलयीन खटले चालवण्यासाठी या केंद्राच्या वतीने सहकार्य केले जाईल. शहर व परिसरातील विधीज्ञ मंडळींनी यासाठी योगदान दयावे असे आवाहन केंद्राचे समन्वयक ॲड. शीतल चव्हाण यांनी केले.
शहरात अँड. शितल चव्हाण यांच्या पुढाकारातुन “लॉयर्स असोसिएशन फॉर जस्टीस (लाज)” या विधी सल्ला व सहाय्यता केंद्राची स्थापना सोमवारी (ता.१६) रोजी बळीराजा गौरव दिनाचे औचित्य साधून केंद्राचा शुभारंभ करण्यात आला . त्यावेळी ते बोलत होते. जेष्ठ विधीज्ञ अँड एम. डी. गायकवाड अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमास ॲड. नीतीन माळी, ॲड. बालाजी सोमवंशी, ॲड. ख्वाजा शेख, ॲड. योगेश जाधव, ॲड. अक्षय तोतला, ॲड. एस. एम. दामावले, ॲड. राजपूत आदी विधिज्ञ उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व विधिज्ञांनी केंद्राचे कामकाज उत्तमरित्या चालवून समाजातील दुबळ्या घटकांना विधी क्षेत्रात सेवा पुरवण्याची ग्वाही दिली. व ॲड. शीतल चव्हाण यांच्या उपक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचे शाहुराज माने, सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ, रोटरी क्लबचे सचिव अनिल मदनसुरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदीप जाधव, निवृत्त शिक्षक विश्वनाथ महाजन उपस्थित होते. अँड. शितल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. युसुफ मुल्ला यांनी सुत्रसंचालन केले. तर प्रदर्शन केंद्राचे समन्वयक करीम शेख यांनी आभार मानले.
