बलसूर/प्रतिनिधी-

आपल्या देशाचे मुलनिवासी हे आदीवासी कोळी महादेव यांच्यासह सर्वच आदीवासी आहेत. बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यासारख्या आदीवासी बांधवानी क्रांती करुन देशासाठी बलिदान दिले अशा राष्ट्र पुरुषांचा विसर पडता कामा नये. जल,  जमीन,  जंगल यावरही खरा अधिकार त्यांचाच आहे शासनाने कोळी महादेव आदीवासी समाजाच्या जात पडताळणीतील जाचक अटी कमी कराव्यात “असे मत  सरपंच सुनिता पावशेरे यांनी व्यक्त केले.

 कलदेव निंबाळा येथे राघोजी भांगरे, क्रांतिकारक बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी   त्या बोलत होत्या .  यावेळी  झबूबाई घंटे,   मधूकर पाटील, गोविंद कोळी, माजी सैनिक शिवाजी बिराजदार, उमाकांत पाटील, तुकाराम डोणगावे, खंडू दळवे,  कल्लेश्रर जकेकुरे,  शिवाजी घंटे,   तुकाराम घंटे, संजय घंटे,  सुमित घंटे,  सूयश घंटे,  शौर्य घंटे,  सुचेतना घंटे, केवळ घंटे,  सुमित्रा घंटे, स्वाती घंटे,  सायली घंटे आदीसह कोळी महादेव समाज बांधव उपस्थित होते. 

दरम्यान जिल्हा परिषदेचे बांधकाम उपअभियंता सुभाष घंटे,  सामाजिक कार्यकर्ते देविदास पावशेरे,  संजीवनी घंटे यांचीही भाषणे झाली. व आदीवासी प्रतिज्ञा घेण्यात आली.  प्रतिमा पूजन आणि निसर्ग देवतांचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी सौरभ घंटे,  स्वस्तिक घंटे यांनी इंजिनिअरिंगमधे विशेष प्राविण्यात  गुण संपादन केल्यामुळे  सरपंच पावशेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सूत्र संचालन देविदास पावशेरे यांनी तर आभार सुभाष घंटे यांनी मानले. 

 
Top