उस्मानाबाद/ प्रतिनिधी

शहरातील सागर ग्रुप स्पोर्ट््स क्लबला १८ वर्षे पूर्ण झाल्यामुळे दिवाळीचे औचित्य साधून ग्रुपच्या वतीने आळणी येथील स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहास १०७ ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सागर ग्रुपचे अध्यक्ष सचिन लोखंडे, प्रशिक्षक राजेश नागदे, गणेश पतंगे, अजित गायकवाड, रिजवान पठाण, लक्ष्मण शिंदे, उमेश साठे, विजय कांबळे, बालाजी वाघमारे, लक्ष्‍मण वामनराव शिंदे, रवी पवार, शहाजी चव्हाण, गुरुनाथ थोडसरे, रेणुका कुदळे, अमित ओव्हळ, निता ढगे आदींची उपस्थिती होती. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वआधार केंद्रातील मुलींना ब्लँकेट्स मिळाल्यामुळे त्यांना हिवाळा सुसह्य होण्यास मदत होणार आहे. या भेटीमुळे दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

 
Top