लोहारा/प्रतिनिधी
करोना रोगामुळे अडचणीत सापडलेल्या गरिब कुंटुबांना मदतीचा हात म्हणून सामाजिक भावना जपत सिमेन्स गमेसा कंपनी व सेवावर्धिनी संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा शहरात व धानुरी येथे व जत (सांगली) भागातील 14 गरिब व विधवा महिलांना शेळी पालनाचे प्रशिक्षण देउन प्रतेकी 2 शेळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख म्हणून गेमेसा कंपनीचे लोहारा क्लस्टर इंचार्ज अभयसिंह बाबर, सीएसार ऍक्टिव्ह चे समन्वयक ज्ञानु कांबळे, रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे पुर्णवेळ कार्यकर्ते शंकर जाधव, धानुरीचे सरपंच गणेश जाधव, कलदेव निंबाळा चे सरपंच सौ.सुनिता पावशेरे, पत्रकार श्रीकांत वडजे, सेवावर्धनी चे समन्वयक चंन्नवीर बंकुर, झी न्युज सोलापूर चे अहमद शेख, सेवावर्धनी प्रकल्प समन्वयक अनिलकुमार राठोड, आदि उपस्थित होते.
या वेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. इम्रान पल्ला यांनी शेळीच्या आहारा बद्दल व विशिष्ठ रोगामध्ये कशी काळजी घ्यायची या बद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच प्रमुख पाहुणे रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे प्रकल्प प्रमुख शंकर जाधव यांनी लाभार्थ्यांना बोलताना असे सांगितले की, आज तुम्ही घेणारे आहात पण एक दिवस तुम्ही देणारे व्हाल, अशी भावना व्यक्त केली. यावेळी लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सेवावर्धनी प्रकल्प समन्वयक अनिलकुमार राठोड यांनी केले तर आभार सेवावर्धनी समन्वयक चंन्नवीर बंकुर यांनी मानले.
