उस्मानाबाद/ प्रतिनिधी
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती उस्मानाबाद जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सार्वजनिक सभागृह मध्ये अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.जी. नवाळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत समिती) नितीन दाताळ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ.संजय तुबाकले यांच्यासह महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एच निपाणीकर यांची उपस्थिती होती.
इंदिरा गांधी यांची जयंती साजरी केल्यानंतर राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त उपस्थितांना शपथ देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
