उस्मानाबाद/ प्रतिनिधी
तालुक्यातील जेवळी येथे तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने सन 2019 ते 2020 मध्येे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच तुळजाभवानी कामगार संघटना अध्यक्ष सुरेश पवार यांच्या हस्ते 130 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच वाटप करण्यात आले.
यावेळी सचिव रवी पवार,कार्यकारी सदस्या कवीता पवार जेवळी चे सरपंच मोहनजी पनूरे,चंद्रकांत ढोबळे, गुंडाप्पा कारभारी,गुणवंत ढोबळे, श्रीशैल ढोबळे, उमेश पवार आदींची उपस्थिती होती.
