मराठवाडा पदवीधर मतदार संघावर विजयाची मोहर उमटवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तत्परतेने कामाला लागावे असे आवाहन राज्याचे माजी मंत्री तथा या मतदार संघाचे निवडणूक प्रमुख आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. ते दि. १७ रोजी भाजपा प्रतिष्ठान भवन येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीस मार्गदर्शन करत होते, या बैठकीस मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश चिटणीस इंद्रिस मुलतानी, प्रवीण घुगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निलंगेकर म्हणाले की, गेली १२ वर्षपासून या मतदार संघात अत्यंत निष्क्रिय पद्धतीने कार्यपद्धती सुरु असुन यामध्ये सुधारणा होण्यासाठी व पदविधरांच्या प्रश्नावर न बोलणाऱ्या उमेदवाराला घरी बसवण्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी करून जिल्ह्यातील सर्व बाबीने आढावा घेतला, यावेळी भाऊराव देशमुख, प्रवीण घुगे यांनी मार्गदर्शन केले, तर या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तर सूत्र संचालन ॲड. नितीन भोसले तर आभार नेताजी पाटील यांनी मानले.
या बैठकीस जिल्हा प्रचार प्रमुख दत्ता कुलकर्णी, ॲड.मिलिंद पाटील, नेताजी पाटील, सुधीर पाटील, खंडेराव चौरे, अनिल काळे, अभय चालुक्य, राहुल पाटील सास्तूरकर, दीपक आलुरे, प्रदीप शिंदे, आदम शेख, राजसिंहा राजेनिंबाळकर, इंद्रजित देवकते, माधुरी गरड तसेच सर्व तालुक्याचे अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी व बुथप्रमुख उपस्थित होते.
