उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 कै शंकरराव धाराशिवकर यांच्या स्मरणार्थ आयोजित शंकर प्रतिष्ठानचा अत्यंत स्तुत्य असा भावनिक कार्यक्रम लक्ष्मी आली घरा नुकताच संपन्न झाला. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीपासून संपूर्ण 24 तासा मधील जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात जेवढ्या मुली जन्माला येतील त्यांच्या प्रत्येकीच्या नावाने 7000 हजार रुपयाची 18 वर्ष मुदतीची सर्टिफिकेट प्रत्येक मुलीच्या नावाने दिली जाते त्याची मुदत अठरा वर्षांनी संपते मिळणारी  रक्कम 50000 हजार एवढी रक्कम मुलीच्या वयाच्या अठराव्या वर्षी मिळत असल्याने शिक्षणासाठी त्यांना अत्यंत चांगला उपयोग होऊ शकतो नुकताच शंकर प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम आकाशवाणी केंद्र समोरील शासकीय स्त्री रुग्णालयात संपन्न झाला.

 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्त्री रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ स्मिता गवळी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ  बाल रोग तज्ञ डॉ अभय शहापूरकर उपस्थित होते. सुरुवातीला डॉक्टर शहापूरकर यांनी शंकर प्रतिष्ठान ची भूमिका व उपक्रमाविषयी माहिती  प्रास्ताविकात दिली. त्यानंतर रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ स्मिता गवळी यांनी स्त्री भ्रूण हत्या मुलीचे शिक्षण संगोपन याविषयी मार्गदर्शन करून उपक्रमाबाबत प्रतिष्ठान चे आभार मानले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष   ज्येष्ठ विधिज्ञ ॲड राजेंद्र धाराशिवकर यांच्या अथक प्रयत्नातून व नियोजनातून हा उपक्रम सातत्याने चालू असून वर्षभरात तसेच असंख्य उपक्रम  राबवले जातात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ऋषिकेश धाराशिवकर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व  कन्यारत्नांचे आई- वडील, नातलंग दवाखान्यातील कर्मचारी वृंद, रेबेका भंडारी सिस्टर, मनीषा करडे वर्षाराणी राठोड यांची उपस्थिती होती. समर्थ बँकेचे व्यवस्थापक डी.जे कुलकर्णी यंानी कार्यक्रमाच्या ठिकाणी ठेवीच्या पावत्या तयार करून दिल्या.


 
Top