येथील करोना च्या काळात पत्रकारांना आरोग्य कवच म्हणून विमाचे वाटप करणारा राज्यातील एकमेव संघ म्हणून कळंब तालुका पञकार संघ ओळखले जाते असुन यापुढे देखील पत्रकारांना लागेल ते योगदान करण्याचे आश्वासन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी केले
येथील शिवसेना कार्यालयात कळंब तालुका पञकार संघाच्या वतीने करोना काळात आरोग्य विमा वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळंब तालुका शिवसेना प्रमुख शिवाजी कापसे हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीत उस्मानाबाद जिल्हय़ाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास दादा पाटील, धनेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापसिंह भैय्या पाटील, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, अदी मान्यवर उपस्थित होते. पुढे खासदार ओमराजे असे मनाले कि लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणून पञकाकडे पाहीले जाते. कोविड १९ या माहामारी च्या काळात स्वत जिवाची पर्वा न करता बाहेर फिरुन वांर्ताकंन करून लोकांना घरी बसून बातम्या बघायला मिळाल्या यासाठी खास करुन पञकारांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. यासाठी कळंब तालुका पत्रकार संघाने पञकारांना विमा काडुन वाटप केले ही एक राज्यात एक आदर्श पुर्ण बाब आहे
पुढे आपल्या अध्यक्षीय मनोगतात शिवाजी कापसे असे म्हणाले कि कळंब तालुका पत्रकार संघ पुर्वीपासुनच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. पाठीमागे सुध्दा महाराष्ट्र राज्यात एक आदर्श संघ म्हणून पुरस्कार प्राप्त असा संघ आहे. करोना च्या काळात पुर्ण कळंब तालुक्यात आपल्या दैनिकाच्या किंवा इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या साह्याने लोकांमध्ये जनजागृती केली म्हणूनच आज तालुक्यात कोविड च्या रुग्णात कमालीची घट आलेली दिसुन येत आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार माधवसिंह राजपूत, पञकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे, ज्ञानेश्वर पंतगे, सतीश मातने, शिवप्रसाद बियाणी, रमेश अंभिरकर, दिपक माळी, परवेज मुल्ला, बालाजी सुरवसे, औकार कुलकर्णी, अदी पञकारांना विमाचे वाटप केले
