आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वात कळंब येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पदवीधर मतदारांची सहविचार सभा पार पडली. यावेळी आमदार चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मतदारांना अपेक्षित काम करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो, गेल्या दोन टर्ममध्ये अनेक शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली. माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या माणसाची जात, पक्ष पाहत नाही असेही यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले
. यावेळी मा. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सतीश चव्हाण यांनी पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जीव ओतून प्रयत्न करावे असे आवाहन केलं. तसंच एका विचाराने एका जिद्दीने चव्हाण यांच्या विजयासाठी प्रयत्न करू आणि सर्वाधिक मतांनी चव्हाण यांना निवडून आणू असं, निंबाळकर म्हणाले.
यावेळी लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर, आ. कैलास दादा पाटील, राष्ट्रवादीचे जेष्ठ मार्गदर्शक जीवांरावजी गोरे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्रजी काळे, उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुरेश बिराजदार, व्यवस्थापन परिषद सदस्य संजयजी निंबाळकर, जेष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष बाळासाहेब हरिपाटील, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईदबारे, उपाध्यक्ष शिवाजी लाकडे सर, राष्ट्रवादीचे युवा नेते नितीनजी बागल, शिवसेना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शामनाना खाबले, शिवसेना चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष संजयजी घुले सर, शिवसेनेचे कळंब तालुका अध्यक्ष शिवाजी आप्पा कापसे, कळंब काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार, नगरसेवक प्रतापजी मोरे , प्रा जगताप सर, प्रा चोरघडे सर, प्रा. घोळवे सर, प्रा. निमकर सर यांच्यासह पदाधिकारी, महाविद्यालयातील कर्मचारी आणि पदवीधर मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शिंदे सर यांनी केले.