परंडा / प्रतिनिधी : -

परंडा येथील आठवडी बाजार सुरु करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली परंतु मंडई पेठेतील कोरोना मुळे दररोज चे भाजीपाला व फ्रुट मार्केट सुरु न केल्याने ते पुर्वी प्रमाणे सुरु करण्या बाबत जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना तहसीलदार परंडा मार्फत दि.६ शुक्रवार रोजी भारतीय जनता पार्टी तालुका भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष राजकुमार पाटील तालुका सरचिटणीस विठ्ठल,तिपाले, माजी जिल्हापरिषद सभापती रमेश नाना पवार, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल पाटील ॲड. अभयसिंह देशमुख,दत्तु अनबुले आदी उपस्थित होते. 

 
Top