शिराढोण/ राजेंद्र मुंदडा-
कळंब तालुक्यातील मौजे बोरवंटी येथील सिध्दीविनायक साखर कारखाना हा आगामी ऑक्टोबर 2021 ला सुरु करणार व मोळी टाकणार, असे आश्वासन कारखान्याचे सर्वश्री आ. तानाजी सावंत यांनी बुधवारी दि १८.११ .२०२० कारखान्यावर उपस्थीत थेतक-यांना दिले. यावेळी कळंब शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे, युवा सेनेचे सूरज साळुंके,यूवासेनचेे उप- जिल्हा. प्रमुख सागर बाराते , जिल्हा सभापती दत्ता आण्णा साळुंके, नानासाहेब टेळे, माळकर आण्णा, मुस्ताक खूरेशी, सचिन काळे, नासेर पठाण, आमोल पाटील, श्याम खबाले, माजेद पटेल, एजास पठान, रामचंद्र घोगरे सह प्रचंड मोठया संख्येने शेतकरी उपस्थीत होते.तब्बल पाच वर्षापासून हा कारखाना उभारणीच्या प्रतिक्षेत होता . सदरील कारखाना आ. तानाजी सावत यांनी घेतल्याचे कळताच परीसरातील शेतकरी आनंदी होते.
परंतू सदरील कारखाना सुरु करण्याच्या दृष्टकोणातून बुधवार दि.१८ नोव्हेंबर रोजी स्वतः तानाजी सावंत व अभियंता प्रमोद जोशी (सिव्हील कन्संटट) सह अन्य अभियंताचा ताफा बोरवंटी येथे दाखल झाला. कारखाना उभारणीचे पूर्ण प्लान घेउन कारखान्याच्या जागेची पाहणी केली व आठवड्याभरातच कारखान्याया-चीमनी’ चे बांधकाम व उभारणीचे काम सुरू करण्याचे आदेश तानाजी सावंत यांनी अभियंत्याला दिले.
यावेळी प्रास्तावीक बोलताना ता.प्र. शिवाजी कापसे यांना कळंब तालूक्यातील थेतकऱ्यांची ख-या अर्थाने आज दिवाळी साजरी झाली. कारण साखर उत्पादनातील मूख्य आ. तानाजी सावंत यांच्या हाताने हा कारखाना उभा होत आसून बेरोजगारांना रोजगारही मिळणार आहे. शेतकऱ्यांना निश्चितच सोन्याचे दिवस येणार असल्याने आ.तानाजी सावंत यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना आ. तानाजी सावंत यांनी स्वत:चा थोडा इतिहास सांगीतला. वयाच्या १६ व्या वर्षी स्वत:च्या शेतात कसेबसे ९ एकर ऊस लावला सायकलीवर वैरागला येऊन भोगावती साखर कारखान्यास वारंवार विनंती करूनही ऊस तुटला नाही. यानंतर मे महिन्यात स्वत: ने गुराळ सुरू करून गुऱ्हाळावर राबून ९ एकर उसाचा गुळ तयार केला व साखर कारखाना स्वत: उभा करण्याची मनात जीद्द पेटली. २००८ साली
परंडा जवळील मौजे सोनारी येथे दररोज १२५० टन क्षमतेचा पहीला कारखाना सुरू केला २००८ ते २०१७ या आठ वर्षामध्ये पाच साखर कारखाने उभे करून आज रोजी कोणाचेही एक रुपया देने ठेवले नाही. मी शेतकऱ्यांचा मूलगा आसुन शेतकऱ्यासाठीच सदैव राबणार सत्कार्यासाठी तुम्हा सर्व शेतकऱ्यांनी एकत्रीत पूढाकार घेऊन हा कारखाना तुम्हीच उभा करा, मी पैसा व मशनरी कमी पडू देनार नाही, मी शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपने उभा आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावल्याशिवाय स्वस्थ बसणारच नाही व कोणत्याही परस्थीतीत २०२१ साली ऑक्टोबर महीण्यात-मोळी टाकणारच व प्रथम चाचणी गळीत हंगामात पहील्याच वर्षी किमान ५ ते ६ लाख मे. टन उसाचे गाळप करून समाधानकारक भावही देणार, अशी उपस्थितांना ग्वाही दिली. केवळ आठवड्याभरातच कामाला सुरुवात होणार आहे. यावेळी बोरवंटी ग्रामस्थांनी अामदार तानाजी सावंत यांचा नागरी सत्कार केला. परंतू अामदार तानाजी सावंत यांनी मोळी, टाकतानाच मी फेटा बोधुन घेणार, असे अवाहन केले
उपस्थितांचे आभार सागर बराते यांनी मानले. यावेळी कळंब तालुक्यातील शेतकऱ्यात आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
