तुळजापूर / प्रतिनिधी

येथील विधीज्ञ अंजली साबळे यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . या निवडीचे पत्र जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना नुकतेच देण्यात आले .

त्यांच्या या निवडीबद्दल आ.राणाजगजितसिंह पाटील , आ.सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, जिल्हा भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष माधुरी गरड, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी साबळे यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top