उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 छगनरावजी भुजबळ यांच्या आदेशावरून ओ.बी.सी आरक्षण संदर्भात अत्यंत तातडीची बैठक उद्या दिनांक 23/11/ 2020 रोजी दुपारी 1 वाजता शिवगौरी फंक्शन हॉल, भारत गॅस गोडाऊन समोर, उस्मानाबाद येथे ओ.बी.सी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सदर बैठकीमध्ये मराठा समाजातील श्री. बाळासाहेब सराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ओ.बी.सी.तील 410 जातींना आरक्षणा बाहेर काढावे अशी याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे समता परिषदेच्या माध्यमातून या विषयावर विचार विनिमय करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष श्री.महादेव माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही मात्र ओ.बी.सी कोट्यातून जे आरक्षण देण्याचा नाहक कुटील डाव दिसून येत आहे,त्यास विरोध आहे.

या बैठकीस विभागीय अध्यक्ष श्री. मकरंद सावे साहेब तसेच सर्व ओ.बी.सी समाजातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत covid-19 या संसर्गजन्य रोगाचे शासनाचे नियम पाळून सदर बैठक घेण्यात येणार आहे.तरी ओ.बी.सी पदाधिकाऱ्यांनी वेळेवर बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ओ.बी.सी संघटना यांनी केले आहे.

 
Top