तुळजापूर / प्रतिनिधी 

येथीलकमानवेस भागात वाहनतळ सुरु करण्याची मागणी स्थानिक पुजारी व नागरिकांनी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे  केली होती. त्याची दखल घेवुन नगरपरिषद ने अखेर कमानवेस भागात नवीन वाहनतळ कामास नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते आरंभ करुन शब्दपुर्ती करण्यात आली.

 कमानवेस भागातील वाहनतळ हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी येत असल्याने व येथुन मंदीर बसस्थानक जवळ असल्याने भाविकांची होणारी भटकंती थांबणारी असल्याने भाविकांचा सोयीसाठी येथे वाहनतळ सुरु करण्याची मागणी पुजारी वृंदांनी केली होती त्याची दखल घेत या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.

यावेळी  नगराध्यक्ष सचिन रोचकरी ,विनोद गंगणे,अंबरीष जाधव,बापुसाहेब कणे,आनंद कंदले,नानासाहेब डोंगरे, श्रीनाथ शिंदे, श्याम भैया क्षीरसागर, अंबादास लोंढे, अविनाश धट, अंबादास चिवचिवे, आनंद क्षिरसागर सर्व नगरसेवक व समस्त कमानवेस मधील जेष्ट नागरीक उपस्थित होते.

 
Top