उस्मानाबाद/ प्रतिनिधी
किडनाशक उर्वरित अंश व किड रोगमुक्त उत्पादनाची हमी देण्यासाठी अपेडा निर्यातक्षम बागांची नोंदणी करणेसाठी ग्रेपनेट, मॅगोनेट, अनारनेट, सिट्रसनेट, व व्हेजनेट या प्रणाली विकसित केलेल्या आहे.
शेतक-यांनी नोंदणी व नुतनीकरणासाठी अपेडाने विकसीत केलेल्या सुधारीत मानांक पध्दतीमधील अॅनेक्झार 1 नुसार शेतक-यांनी ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने नोंदणी अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचेकडे विहित प्रपत्रात अर्ज सादर करतात. या वर्षी राज्यात निर्यातीस चालना देण्यासाठी मोठया प्रमाणावर निर्यातक्षम बागाच्या नोंदणीचा लक्षांक कृषि विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेला आहे.
जिल्हयात कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्याने, शेतक-यांना कृषि विभागाकडे जाणे येणे. या अडचणीवर मात करणेसाठी फलोत्पादन विभागाने अपेडा कार्यालयामार्फत फार्म रजिस्ट्रेशन कनेक्ट मोबाईल अॅपद्वारे निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी राज्य पातळीवर दिनांक 21 ऑक्टोंबर-2020 रोजी सर्व संबधित अधिकारी सहभागी संस्था व प्रगतीशील शेतक-यासाठी वेबीनारद्वारे कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेमध्ये निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी शेतक-यांनी ॲडरॉईड मोबाईल अॅप मध्ये गुगल प्ले स्टोअर द्वारे अपेडाने विकसीत केलेल्या फार्म रजिस्टेशन मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यासाठी http://play.google.com/store/appsdetails?id=in.gov.apeda.apedaapp या लिंकवर क्लिक करावे.
या माहितीमध्ये स्व:तचे नाव, मोबाईल क्रमांक, आधार नंबर व ई - मेल आयडी ही माहिती भरल्यानंतर शेतक-यांना ऑनलाईन पध्दतीने नोंदणी अधिका-याकडे अर्ज करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध होत आहे.
राज्यातील फलोत्पादन उत्पादक शेतक-यांनी त्यांच्याकडील निर्यातक्षम बागांची नोंदणी अपेडाने विकसीत केलेल्या फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल अॅपद्वारे करावी व आपणाकडील जास्तीत जास्त कृषी उत्पादीत मालाची निर्यात करावी.या प्रकरणी काही अडचणी आल्यास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा.यावर्षी विहित मुदतीत बागांचे नोंदणी /नुतनीकरण करण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करावा.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यु.आर.घाटगे,उस्मानाबाद यांनी केले आहे.