उस्मानाबाद/ प्रतिनिधी
पोलीस स्टेशन,येरमाळा येथे दि.30 ऑक्टोंबर-2020 रोजी अमोल प्रकाश दुधाळ वय 32 वर्षे व्या शेती रा.दुधाळवाडी ता.कळंब यांनी पोलीस स्टेशन हजर येवुन जबान दिली की,त्यांची पत्नी नामे सोनाली अमोल दुधाळ वय-23 वर्षे ही दि.30 ऑक्टोंबर-2020 रोजीचे 1430 वा.चे सुमारास कोणास काही एक न सांगता त्यांचे दुधाळवाडी शिवारातील शेतात असणारे जनावरांचे कोठयावरुन निघुन गेली आहे.तीचा आज पावोतो शोध घेतला ती मिळाली नाही. त्यांच्या तक्रारीवरुन वर नमुद प्रमाणे मिसींग दाखल आहे.
मिसींग महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. नाव-सोनाली अमोल दुधाळ, गाव-रा.दुधाळवाडी ता.कळंब जि.उस्मानाबाद,वय-23 वर्षे, रंग-गोरा, चेहरा-गोल व नाक सरळ, बांधा-सडपातळ, उंची-5फुट, पोशाख-हिरव्या रंगाची साडी, गोल्डन रंगाचा ब्लाउज, गळयात मनीमंगळसुत्र, झुमके घातलेले व निक्या रंगाची ओढणी, भाषा-मराठी. वरील वर्णनाची महिलाची माहिती मिळल्यास या संपर्क क्रमांकावर:-पोलीस स्टेशन येरमाळा फोन नं.02471246033, सपोनि सोनवणे प्रभारी अधिकारी मो.8208513100, पोउपनि राडकर तपास अधिकारी मो.7083881600 येथे संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन, येरमाळा यांनी केले आहे.