उस्मानाबाद/ प्रतिनिधी
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने तसेच या कार्यालयाने वेळोवेळी आदेश निर्गमित केलेले आहेत. तसेच कोविड-19 चा प्रादुर्भाव होईल.अशा प्रकारचे गैरकृत्य केल्यास अशा व्यक्तींवर करावयाच्या दंडात्मक कार्यवाहीबाबत सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, गुटखा, तंबाखू इ. तत्सम पदार्थाचे सेवन करण्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
उस्मानाबाद न्यूज या वृत्तपत्रात “उस्मानाबाद शहरात तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणा-यावर गुन्हा दाखल:पुर्ण शहरात कारवाई करण्याची नागरिकांची मागणी ।” असे वृत्त प्रसिद्ध झालेले आहे. सकाळी लवकर उठणारे काही नागरिकांनी नगरपलिकेच्या स्वच्छता करणा-या कर्मचा-यांना सहानुभूती दाखवत सोशल मिडीयावर काही पोस्ट व्हायरल केले आहेत. ज्यामध्ये चौकात दुकानांसमोर पडलेल्या तंबाखूजन्य पदार्थाच्या पुढ्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्या दुकानदारांनी दुकानासमोर कच-याची विल्हेवाट न लावल्यामुळे नागरिकांनी त्याची पोस्ट व्हायरल करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शहरात पान, तंबाखू यांचे केवळ विक्रीस परवानगी देण्यात आलेली असून सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, गुटखा, तंबाखू इ.तत्सम पदार्थांचे सेवन करण्यास व सार्वजनिक ठिकाणी धुंकण्यास मनाई असल्याने पान,तंबाखू खरेदी करणा-या ग्राहकांना सार्वजनिक ठिकाणी पान,तंबाखू इ.पदार्थांचे सेवन करण्यास व सार्वजनिक जागी थुंकण्यास प्रतिबंध करणेबाबत पान,तंबाखू विक्री करणा-या विक्रेत्यांनी आदेशात नमूद केल्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मदय,पान,गुटखा,तंबाखू इ.तत्सम पदार्थाचे सेवन करणा-या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तींवर तात्काळ दंडात्मक कार्यवाही करणेबाबत काटेकोरपणे प्रभावी कार्यवाही करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री.शिवकुमार स्वामी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.